सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रीन गार्डन मंगल कार्यालय येथे सोमवारी ( दि. २३ ) सकाळी ११ वाजता नाभिक समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होत आहे. तसेच शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मण वडेले आणि एक लव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे आदींचे मार्गदर्शन तसेच जिल्हा कार्यकारणीतील निवड व विविध विषयावर चर्चा होणार आहे.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे अध्यक्ष रमेश राऊत, उपाध्यक्ष सुनिल जगताप, जिल्हाध्यक्ष अशोक मगर आदींसह जिल्ह्यातील तालुका संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारणीसह नाभिक बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती बारामती ग्रामिणचे अध्यक्ष धिरण पवार यांनी दिली.
...................................