Sugar Factory l ५७ कोटी ३२ लाख 'एफआरपी'ची रक्कम थकवली : पुणे जिल्ह्यातील 'या' कारखान्यावर जप्ती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या एफआरपीचे सुमारे ५७ कोटी ३२ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी आठ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. 
        या कारखान्यांमध्ये राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
२०२४-२५ च्या गाळप हंगामात
महाराष्ट्रातील आठ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देय असलेली ५७ कोटी ३२ लाख रुपयांची एफआरपी रक्कम वेळेवर अदा केली नाही. साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावून सुनावणी घेतली. सुनावणीनंतर ही थकीत रक्कम जमा न झाल्याने, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस व बगॅस यांसारख्या मालमत्तेची विक्री करून थकीत रक्कम वसूल करण्यात येणार आहेत.
To Top