सोमेश्वर रिपोर्टर टीम --------
बारामती : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता जि- अहिल्यानगर येथील प्रा. हनुमंत माने व फलटण साखरवाडी येथील निवेदक सुधीर नेमाणे यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाले आहेत.
या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे. बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन दि.२४,२५ व २६ जून २०२५ रोजी होणाऱ्या महोत्सवानिमित्त हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रा. हनुमंत माने यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे. व संभाषण कौशल्य विकसित व्हावे. यासाठी संभाषण कला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्न व मार्गदर्शन केले आहे.