सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज पार पडत असून या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे बोलले जात आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत 88.50 टक्के मतदान झाले आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी होणार आहे. आज सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदान प्रकिया बॅलेट पेपर वर राबवली गेल्याने मतमोजणीला उशीर लागणार असून प्रत्येक्ष निकालाला रात्र होऊ शकते. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार आज 24 जून रोजी लागणार आहे. त्याआधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
67 मतदान केंद्रांवर आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना झाल्याचे पाहायला मिळाले जवळपास 67 मतदान केंद्रांवर आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक अजित पवार यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार असलेले 'ब' वर्ग सभासद संस्था मतदारसंघात १०२ मतदार आहेत. त्यातील १०१ जणांनी मतदानाचा हक्का बजावला. या प्राप्त स्थितीचा विचार करता माळेगावचे चेअरमन होणे अजित पवार की चंद्रराव तावरे यांच्या नशीबात आहे, हे आज मंगळवार (ता. २४) रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.