Phaltan News l जिंती अपहरण प्रकरणी लोणंद पोलिसांनी चौघांच्या आवळल्या मुसक्या : एक आरोपी अजूनही फरार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
फलटण तालुक्यातील जिंती येथील एका १७ वर्षीय महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करून त्यालाअमानुष मारहाण करून रस्त्यावर सोडले होते. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून अजून एक आरोपी फरार आहे. 
      राकेश उर्फ मोन्या रमेश रा. वय २९ निंभोरे ता. फलटण आशुतोष उर्फ बट्या संतोष जाधव वय 21 वर्षे दोन्ही राहणार सात सर्कल साखरवाडी तालुका फलटण, प्रवीण किसन मोहिते वय 27 वर्षे राहणार साखरवाडी तालुका फलटण  सिद्धांत यशवंत बनसोडे वय 19 वर्षे राहणार साखरवाडी तालुका फलटण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अजय शशिकांत सपकाळ राहणार साखरवाडी तालुका फलटण हा अजून फरारी आहे. 
         फलटण तालुक्यातील काळज (ता. फलटण) गावाजवळ लोणंद येथील महाविद्यालयातून परतणाऱ्या प्रतीक प्रमोद रणवरे (वय १८, रा. जिंती, ता. फलटण) या युवकाचे भरदिवसा अपहरण करून त्याच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली होती.  पाच जणांच्या टोळक्याने प्रतीक याचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.अपहरणानंतर या टोळक्याने प्रतीकला अज्ञात ठिकाणी नेऊन रात्री ११ वाजेपर्यंत अमानुष मारहाण केली. या टोळक्याने त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी व काठीने प्रचंड मारहाण करत जीवघेणा प्रकार केला होता.
To Top