Velhe Braking l मिनल कांबळे l राजस्थानवरून नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेल्या १३ वर्षांच्या सोहनलालचा पानशेत धरणात बुडून मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजस्थानवरून पानशेत येथे सुट्टीसाठी आलेल्या 13 वर्षांच्या मुलाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची  माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.
           याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगीतले की राजगड तालुक्यातील पांनशेत धरणात आंघोळीसाठी गेलेल्या सोहनलाल लखमाराम रायिका असून वय वर्ष तेरा असून तो मूळचा पाली तहसील राजस्थान इथला राहणारा आहे. दहा पंधरा दिवस पुण्यामध्ये सुट्टी करता आला होता. आपल्या नातेवाईकासोबत तो पानशेत येथे राहत होता.पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्यात तो बुडाला आहे. त हवेली व वेल्हे आपत्ती व्यवस्थापन टीम कडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. व मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून  गणेश सकपाळ, संजय चोरगे  निलेश जाधव ,निलेश तारू ,उत्तम पिसाळ ,सनी माने पोलीस हवालदार युवराज सोमवंशी ,मंडल अधिकारी  प्रशांत ओव्हाळ दिग्विजय ठाकर किरण पवार जगदीश आडे रामेश्वर राठोड सागर राठोड,आदींनी प्रयत्न केले.
याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत
To Top