Satara News l लिफ्टचा बाहणाकरून दुचाकीस्वाराला लुटले : उंब्रज पोलिसांनी अवघ्या सहा तासात आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
उंब्रज : प्रतिनिधी
उंब्रज ता. कराड येथील पाटण तिकाटने बोगदयात लिफ्टचा बहाणा करून एका दुचाकीस्वराला लुटण्याचा प्रकार घडला आहे.त्याच्या जवळील मोबाईल व रोख रक्कम चोरट्यांनी पसार केला. उंब्रज पोलिसांनी अवघ्या सहा तासात आरोपींना अटक केली आहे. 
            याबाबत श्रीकांत गोपु राठोड वय 45 वर्ष रा. वाठार किरोली ता. कोरेगांव जि. सातारा यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आकाश संतोष आटोळे व अमोल रमेश चव्हाण दोघे रा. लक्ष्मीनगर उंब्रज ता. कराड यांनी फिर्यादी यांचेकडे लिफ्ट मागुन त्यांचे मोटार सायकल वर बसुन वरद विनायक मंगल कार्यालय पुढे नदी काठाला अंधारात मोटार सायकल थांबविण्यास सांगुन फिर्यादी यांना मारहान करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी राठोड यांच्या खिशातील २० हजारांचा मोबाईल व रोख रक्कम असे एकुण ३४ हजार लंपास केले.ही घटना दि.  १ जून रोजी रात्री १० वाजता घडली. याबाबत तक्रार पोलिस ठाण्यास प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी लागलीच तपास पथक बनवून आरोपींना अवघ्या सहा तासात ताब्यात घेऊन गुन्ह्यांत चोरीला गेलेला मोबाईल व रोख रक्कम आरोपीत यांचे कडून जप्त केली आहे.
       सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली API रविंद्र भोरे, PSI गणेश भोसले, पोलीस हवालदार संजय धुमाळ, युवराज पवार, दिनेश भोसले तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, मयूर थोरात, राजू कोळी, मधुकर मांडवे, प्रशांत पवार यांनी केली आरोप अटक करण्यास पुसेगाव पोलीस ठाण्याची मदत झाली गुन्ह्याचा पुढील तपास PSI भोसले करीत आहेत.
To Top