Velhe News l राजगड तालुक्यातील अवैध धंदे व दारू विक्री ताबडतोब बंद करावी : युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील परिसरात काही व्यक्ती बेकायदेशीररित्या दारूची विक्री करीत आहेत. यामुळे परिसरातील वातावरण बिघडले असून, युवकांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. तसेच महिलांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.बेकायदेशीर प्रकारामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत आहे.  तात्काळ योग्य ती कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
             अन्यथा युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन पोलिसांना देण्यात आले यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेस  अध्यक्ष उमेश पवार रामचंद्र रेणुसे तालुका अध्यक्ष संजय वालगुडे सेवा दलाचे अध्यक्ष विष्णुबाळा रेणुसे सुनिल रेणुसे लक्ष्मण रेणुसे  मारुती देवगीरीकर गणेश उबाळे, एकनाथ कडू, विद्यार्थी अध्यक्ष गणेश गिरंजे, प्रकाश रेणुसे, भाऊ दसवडकर, उत्तम पांगारे, मंगेश भोरेकर, संदेश शिळीमकर आदीसह नागरिक उपस्थित होते.
Tags
To Top