सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील संजय पांडुरंग वालगुडे यांची राजगड तालुका काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांच्या सहीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच युवक अध्यक्षपदी रामभाऊ रेणुसे यांना आणि सेवादल अध्यक्षपदी विष्णू बाळा रेणुसे यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य यशराज पारखी,पुणे जिल्हा निरीक्षक लहू निवगुणे राजगड काँग्रेस चे नेते प्रकाश रेणूसे,विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश गिरंजे,शंकर पानसरे,मारुती पानसरे,नितीन चोरगे, सुनील शिंदे, गणेश ननावरे रविंद्र कोंढाळकर अक्षय वालगुडे तालुक्यातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.