सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
भरधाव वेगाने बारामतीकडे निघालेल्या चार चाकी वाहनाने रस्त्याचा दुभाजक ओलांडुन दुचाकीस्वराला दिलेल्या धडकेत दोघेही जागीच ठार झाल्याची घटना बारामती तालुक्यातील उंडवडी - पाटस रस्त्यावरील शिर्सुफळ फाट्यावर दि. १० रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.
विशाल रामचंद्र कोकरे ( वय ३४, धंदा शेती रा धुमाळवाडी पणदरे, ता. बारामती जि पुणे ), तर अमित लक्ष्मण लगड ( रा. गोपाळवाडी भुईटेनगर ता. दौंड ) हे दोघे अपघातात जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एक राज्य राखीव दलातील पोलिस तर दुसरा इंजिनिअर होता.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात पाटस बाजुकडुन बारामतीकडे जाणाऱ्या टाटा टिगोर या चार चाकी ( एम एच ४२ बी ई ५८६६ ) चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडुन बारामतीकडुन येणाऱ्या दुचाकीस्वराला ( एम एच ४२ बीए ६८७५ ) जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वराचा आणि चार चाकी चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना उंडवडी नजीक शिरसुफळ फाट्यानजीक रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.
येथील अपघात एवढा भिषण होता की चारचाकी वाहनाने दुचाकी ३०० फुट अंतरावर फरफटत जावुन लोखंडी संरक्षित कठड्याला आदळली. त्यामध्ये दुचाकीचे चाक चारचाकी वाहनाचे समोरील काच फोडुन आत घुसले होते. त्या दुचाकीचे चाक अखेर क्रेनच्या साहाय्याने बाहेर ओढुन काढावे लागले. यामध्ये दोन्ही चालकांना आपला प्राण गमवावा लागला. यामध्ये कोकरे यांचे शिर धडा वेगळे झाले होते.
यावेळी सुपे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे आणि त्यांचे कर्मचारी सचिन किकने, सोमनाथ होले यांनी घटनेचे प्रसंगावधान राखुन मृत्युदेह ताब्यात घेवुन शवविच्छेदनासाठी पाठवुन दिले.
मात्र या दोन्ही मृत्युस अमित लगड हेच कारणीभुत असल्याची फिर्याद हर्षद रामचंद्र कोकरे ( वय ३२, धंदा शेती रा धुमाळवाडी पणदरे, ता. बारामती जि पुणे ) यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. यासंदर्भातील अधिक तपास सुपे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी करीत आहेत
कोकरे हे मागिल साडेतीन वर्षापासुन अल्कील ॲमिनस कंपनीमध्ये बॉयलर इंजिनिअर म्हणुन काम करीत होता. त्यापश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तर अमित लगड हे राज्य राखीव पोलिस म्हणुन दौंड कार्यरत होते.
..........................................