सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
विसगाव खोऱ्यातील धावडी ता.भोर येथील शेतकरी कुटुंबातील अभिजित रामचंद्र गोळे याने खडतर प्रवास व कठीण परिश्रम करून सनदी लेखापालची (सी.ए.) परीक्षा उत्तीर्ण झाला.त्याने वीसगाव खोऱ्यातील सनदी लेखापाल होण्याचा मानही मिळवला.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. त्यामध्ये अभिजित गोळे याने यश संपादन केले.वडील रामचंद्र गोळे यांनी शेतकरी असतानाही उच्च शिक्षण घेण्यासाठी अभिजीतला पाठबळ दिले.अभिजितने लहानपणापासून आई वडिलांचे कष्ट आणि मेहनत पाहून उच्च शिक्षण घेतले.त्याने गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.तर खानापूर ता.भोर येथील सरनोबात शिदोजी थोपटें खानापूर येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील जेधे कॉलेजमध्ये पदवीर्यंतचे (बीकॉम) पशिक्षण पूर्ण केले.पदवीचे शिक्षण घेतानाच अभिजित याने सीएच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. विसगाव खोरे परिसर तसेच धावडी ग्रामस्थांकडून अभजितचे अभिनंदन केले जात आहे.