Baramati Crime l अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल : मुढाळे-ढाकाळे रस्त्यावरील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
शाळा सुटल्यानंतर घरी पायी निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न करून तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीसात एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तेजस कदम रा.मुढाळे कदमवाडी ता.बारामती जि.पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        ही घटना दि. २२ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मुढाळे गावचे हददीतील मुढाळे -ढाकाळे रोड वरील फाँरेस्टच्या हद्दीत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही शाळा सुटल्या नंतर मुढाळे गावचे हददीतील मुढाळे -ढाकाळे रोड वरील फाँरेस्टचे जमिनी जवळून घरी पायी चालत येत असताना आरोपी तेजस कदम याने त्याच्या कडील स्कुटी मोटार सायकली वरुन मुढाळे बाजुकडून येऊन फिर्यादीची भाची हिचे जवळ मोटार सायकल थांबवुन तिचा डावा हाता धरुन तिला ओढून स्कुटी मोटार सायकली बसवण्याचा प्रयत्न करुन तिला शिवीगाळ दमदाटी करुन बघुन घेण्याची धमकी दिली आहे.
To Top