सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सुपे : दिपक जाधव
मागिल तीन महिण्यांपासुन थाळनेर ( जि. धुळे ) येथुन बेपत्ता असलेल्या संतोष शिरसाट यांच्या मुलासोबतची भेट सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुपे ( ता. बारामती ) येथे घडुन आली.
संतोष शिरसाट ( वय ६५ रा. थाळनेर जि. धुळे ) असे हरवलेल्या व्यक्तीचे नाव होते. सुपे येथे संतोष शिरसाट हे मागिल आठवड्यापासुन गावात फिरत होते. त्यांच्या अंगावर मळके कपडे, दाढी केस वाढलेली अशी वयस्कर व्यक्ती येथील हॉटेल श्वेता मध्ये आली. यावेळी हॉटेल मालक ओंकर इंगळे आणि तेथे असणारे अमोल धेंडे यांनी त्या व्यक्तीस नाव पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने स्वत:चे नाव संतोष शिरसाट सांगुन थाळनेर येथील असल्याचे संगितले. मात्र त्यांना थाळनेर कुठे आहे हे सांगता येत नव्हते.
यावेळी अमोलला डीजे बॅंड ची आवड असल्याने थाळनेर डीजे बॅंड ही इंस्टाग्रामवर पोस्ट केली. त्यावेळी थाळनेर हे धुळे जिल्ह्यात असल्याची माहिती समजली. त्यानंतर डीजे बॅंडच्या मालकाचा मोबाईल शोधुन थाळनेरच्या सरपंचाला फोन केला. यावेळी सरपंचाने थाळनेर गावात शिरसाट आडनावाची १००० कुटुंब राहात असल्याचे सांगितले. पण काही वेळात सरपंचाने माहिती घेवुन त्यांच्या मुलाचा मोबाईल नंबर धेंडे यांना शोधुन दिला. त्यानंतर मुकेश शिरसाट यांच्याशी संपर्क करुन तुझे वडील सुप्यात असुन तु लवकर ये असे सांगितले. त्यांचा मुलगा मुकेश आल्यावर वडीलांना कुटुंबाच्या स्वाधिन केले. मुलगा सुप्यात येईपर्यंत धेंडे यांनी त्याच्या वडीलांना केशकर्तनालय शॉप मध्ये घेवुन गेले, तिथे त्यांची वाढलेले केस दाढी केली.
अमोलने या सर्व घाडामोडी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शेअर केल्याने संतोष शिरसाट यांच्या कुटुंबाचा शोध लागला. अन त्या पिता पुत्राची भेट सोशल मिडीयाच्या माध्यमातुन घडुन आली. सोशल मीडियाचा किती चांगल्या प्रकारे वापर होतो याचा चांगला अनुभव आल्याचे धेंडे यांनी सांगितले. त्यामुळे सुपे परिसरात धेंडे यांनी केलेल्या सोशल मिडीयाच्या घडामोडीचा कौतुकाचा विषय ठरत आहे.
..................................