सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
विसगाव खोऱ्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.२३ प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.तर अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त माजी मुख्याध्यापक रमेश बुदगुडे यांच्यावतीने श्री काळेश्वरी माध्यमिक विद्यालय आंबाडे,पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेरे,
पालसिध्देश्वर विद्यालय वरवडी पाले,बाजी पासलकर विद्यालय बाजारवाडी,रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी,कान्होजी जेधे विद्यालय कारी, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय रावडी,रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टीटेघर,जिजामाता ईंग्लिश मिडियम स्कूल भोर येथील ५ ते ७ वी,८ ते १० वी व ११ वी ते १२ वि या तीन गटातील ५०० विद्यार्थ्यांच्या
वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विजेते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस देण्यात आली.यावेळी माजी मुख्याध्यापक बुदगुडे बोलताना म्हणाले लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि पत्रकार होते.
"*स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या त्यांच्या प्रसिद्ध घोषणेसाठी ते ओळखले जातात. त्यांना "लोकमान्य" ही उपाधी मिळाली.ज्याचा अर्थ लोकांनी मान्य केलेले नेते असा होतो.यावेळी महादेव बुदगुडे, ह.भ.प शंकर महाराज शिंदे,शिवाजी थोपटे,जयवंत थोपटे,स्वामी सेवेकरी संतोष कदम यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.