Bhor Breaking l संतोष म्हस्के l भोरचे रस्ते आहेत की घसरगुंड्या...! चिखलमय रस्त्यावरुन एसटी थेट गटारात : मागील १५ दिवसात तीन एसटी बस घसरल्याची घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी 
भोर तालुक्यात सध्या पाउस जोरदार कोसळत असून रस्त्यांच्या शेजारील साईड पट्ट्या चिखलमय झाल्याने तसेच रस्ते अरुंद असल्याने एसटी बस गटरात घसरण्याचे सत्र सुरूच आहे.मागील आठवड्यात भोर-महुडे मार्गावर दोन एसटी बस साईड पट्टीवरून घसरले असतानाच मंगळवार दि.१४ रोजी भोर- दुर्गाडी मुक्कामी एमएच ०६ एस ८२९८ एसटी रस्त्याच्या साईड पट्टीवरून घसरून गटारात उलटली. चालकाच्या सतर्कतेने प्रवासी बचावले.
         भोर वरून दुर्गाडीकडे मुक्कामी सायंकाळच्या वेळी एसटी बस जात असताना पावसामुळे साईड पट्टीवर झालेल्या चिखलातून बसचे चाक घसरले यात एसटी गटराच्या बाजूला कलमली.बसमध्ये वाहक चालक तसेच पाच प्रवासी होते.मात्र वाहकाच्या सतर्कतेने सर्व प्रवासी बचावले.रात्रीची वेळ असल्याने गटरात कलंडलेली एसटी बाहेर काढता आली नाही. मात्र बुधवार दि.१६ स्थानिक कोंडीबा पोळ,नथू पोळ, संतोष पोळ ,सोनाबाई पोळ ,संजय शिरवले, हौशीराम पोळ, राहुल मळेकर तसेच इतर नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.एसटी बसचे किरकोळ नुकसान झाल्याचे भोर एसटी आगाराचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.एकाच आठवड्यात तीन वेळा भोर आगाराच्या एसटी बसचा गटांमध्ये कलांडून अपघात झाल्याने एसटीत बसण्यासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तर ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

To Top