सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील चाळीसगाव खोऱ्यातील चिखलगाव धोंडेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत हरूबाई राजाराम आंबवले यांच्या घरातील घर संसार जळून खाक झाला.आगीत ७ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
भर पावसात बुधवार दि.२ जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान घरात शॉर्ट सर्किट झाल्याने काही क्षणातच पूर्णता घराला आग लागली आणि घरातून आगीचे लोट बाहेर पडू लागले.पाऊस चालू असतानाच जोरदार वारे असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने हरुबाई आंबवले यांचा पूर्णतः घर संसार काही क्षणातच जळून खाक झाला.आग विझवण्यासाठी भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला तात्काळ प्राचारण करण्यात आले.अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिक तसेच तरुणांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.आग विझवली गेली. मात्र आगीत घरातील धान्य ,कपडे- लात्ता, चीज वस्तू जळून खाक झाल्या तर घरातील सिलेंडरचा आगीत मोठा स्पोर्ट झाला.मात्र नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत घरात कोणीही नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.