सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात सुमारे ४७५ जणांनी लाभ घेतला. यावेळी त्यांना मोफत आरोग्यविषयी मार्गदर्शन, तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले.
येथील जीवन साधना फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जीवन साधना फाऊंडेशन व स्प्रिंग ऑफ डिझर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालय, सुपे येथे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, जेष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर बापु कौले, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे, विद्यमान अध्यक्ष पोपटराव चिपाडे, विद्या प्रतिष्ठानच्या सुपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळे, प्रा. दत्तात्रय शिंदे, मोरगाव प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी शिंदे, सुपे विज महावितरणचे अभियंता के. के. चव्हाण, बबन तावरे, टाटा प्रोजेक्टचे अधिकारी अमोय किर्तयानी, जीवन साधना फाऊंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे, सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे, संचालक अशोक बसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थी, श्री शहाजी विद्यालयातील विद्यार्थी आणि या परगण्यातील सर्वसामान्य नागरिक आदी या शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ सुमारे ४७५ जणांनी घेतला. यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते आरोग्य टीमचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या शिबीरात रुग्णांची तपासणी डॉ. अभय साळवे, डॉ. आजिता कुबेर, डॉ.उषा कुसकर, डाॅ. सिंग होंग किम व डाॅ. संग वुक सिओ आदींनी केली.
या शिबिरासाठी स्प्रिंग ऑफ डिझर्टचे अध्यक्ष गोविंदा सकट, स्नेहा सकट, जयश्री पवार,अशोक पवार, कविता मनिराज, माधुरी पाटोळे, मिना खंडाळे, सुनिता सकट, नागेश अनंतपुरी, राहुल पाटोळे, विरु वाघमारे, पायल ढमे, श्रेयस फुलपगर व प्राजक्ता शाळेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी आभार मानले.
...........................