सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
निरा खोऱ्यातील धारणांची शंभरीकडे वाटचाल सुरू असून निरा देवघर ८० टक्के, भाटघर ९३ टक्के वीर ८८ टक्के तर गुंजवणी ७२ टक्के भरले असून पावसाचा जोर वाढल्याने भाटघर मधून १६०० क्यूसेस तर वीर मधून निरा नदीत ५ हजार ३०० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
आज वीर धरणातील पाणीसाठा व पाण्याची आवक लक्षात घेता , वीर धरणात ९२ % पाणीसाठा नियंत्रीत करून राहिलेला विसर्ग निरा नदीपात्रात सोडला आहे.
वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने दि.२६ जुलै २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ३१८ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.