Indapur Breaking l संतोष माने l तीन जिल्ह्यांची वरदायिनी उजनी @ ९५.३९ टक्के : नदीपात्रात १५ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
पुणे, अहिल्यानगर, व सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण आज म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजता 95. 39% भरले आहे. वरील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून दुपारी तीन वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून पंधरा हजार कयुसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेले आहे.      
           त्यामुळे भीमा नदी पात्रातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे प्रसिद्धपत्र उजनी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता रा. पो . मोरे यांनी काढले आहे. वरील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दुपारच्या दरम्यान उजनी धरणात बंडगार्डन व दौंड येथील सुमारे दहा हजार कयुसेक ने पाण्याचा विसर्ग उजनीच्या पात्रात येत आहे. आगामी एक-दोन दिवसात पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात आल्याने उजनीतून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. वास्तविक पाहता गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वीच उजनी धरण 100% झाले असते. परंतु अजून काही दिवस पावसाळा बाकी आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात दररोज पाणी सोडले. आज दुपारी तीन वाजता पंधरा हजार कयुसेक ने दुपारी तीन वाजता भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. उजनीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने, पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच गाळपेर द्वारे केलेली कडवळ, भुईमूग, किंवा मका ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
To Top