सुपे परगणा l सुपे पोलिस स्टेशन आवारात वृक्षारोपण : सुमारे १०० देशी झाडांची लागवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील पोलिस स्टेशनच्या आवारात सुमारे १०० देशी झाडांची लागवड करण्यात आली. 
बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. 
     सुपे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलिस स्टेशनच्या आवारात वड, पिंपळ, करंज आणि लिंब आदी आठ ते दहा फुट उंचीच्या सुमारे १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी याकामी पुढाकार घेतला. तसेच लावण्यात आलेल्या सर्व झाडांची निगा योग्यप्रकारे राखण्यात येणार असुन प्रत्येक झाडांना ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नवसरे यांनी सांगितले. 
       त्यानुसार डॉ. सुदर्शन राठोड आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, ज्ञानेश्वर कौले, पोपट पानसरे, शौकत कोतवाल, पोपट खैरे, आप्पा शेळके, पोपट तावरे, दिलीप खोमणे, अनिल लडकत, अनिल हिरवे, काका कुतवळ, जयराम बाराते, योगेश लोणकर, रमेश बोरकर तसेच परिसरातील गावचे पाटील, सुपे येथील उपनिरिक्षक जिनेश कोळी तसेच पोलिस स्टेशनचा सर्व स्टाप आदी मान्यवर उपस्थित होते. 
          .....................................
To Top