सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणावळा : श्रावणी कामत
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये बसचा चालक हा ठार झाला असून इतर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत.
लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी राज्य शासनाची एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस ने पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात बसमधील तीन प्रवासी गंभीर जखमी तर पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत एसटी बस ने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने बसमधील चालकाचा वाहनात अडकून गंभीर दुखापत झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये बारामती आगारचा चालक इर्शाद शेख यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात तीन प्रवासी गंभीर तर पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यानच्या काळात पुण्याहून मुंबईकडे जाणारे अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख हे ही मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवून अपघात ग्रस्त जखमीना तातडीची मदत देत त्यांना सर्वतोपरीने मदत करत रुग्णालयात पोहोचवले.
जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेचा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.