Baramati News l बाबुर्डीत डिजिटल क्यूआर कोडवरील आधारीत कर वसुली सुरु

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथे डिजिटल क्यूआर कोड वरील आधारित कर वसुली प्रणालीचा शुभारंभ स्वातंत्रदिनी करण्यात आला. 
         १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाबुर्डी ग्रामपंचायतमध्ये क्यूआर कोडवर आधारित कर वसुली व इतर सुविधांचा शुभारंभ बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आला. 
        याप्रसंगी बारामती पंचायत समितीचे सहा. गटविकास अधिकारी नंदन जरांडे, बांधकाम उपअभियंता शिवकुमार कुपल, विस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे, भिमराव भागवत, श्रीकांत दणाणे, आदित्य शेटे, सतीश बोरावके आदी उपस्थित होते. 
        यावेळी किशोर माने यांनी तालुक्यात प्रथमच डिजिटल उपक्रम बाबुर्डीत सुरु होत असल्याची माहिती दिली. या क्यूआर कोडवर आधारित करवसुली व इतर सेवांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यामुळे आता ग्रामस्थांना घरबसल्या कर भरता येणार आहे. तसेच दाखलेही आणि आपली मिळकतही घरबसल्या बघता येणार आहे. त्यामुळे या संकल्पनेच्या आधारे १०० टक्के कर वसुली करण्याबाबतचे आवाहन माने यांनी केले आहे.
     यावेळी सरपंच दत्तात्रय ढोपरे, उपसरपंच मंगल लव्हे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, ग्रा. पं. सदस्य रुपाली लडकत, अर्चना पोमणे, संतोष पोमणे, लक्ष्मण पोमणे, सचिन लडकत, देवराज पोमणे, सुरेश राऊत, रवी केदार, ज्ञानेश्वर महानवर, सागर पोमणे, बाळासो शेंडे, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशासेविका आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी निलेश धारकर यांनी केले तर ज्ञानेश्वर पोमणे यांनी आभार मानले.
        ............................................
To Top