सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
होळ ता. फलटण येथील शेखर नंदू भोसले हा आठ दिवसांपूर्वी होळ येथील घरातून मित्राच्या गाडीवर बसून गेला. आठ दिवसांनंतर त्याचा थेट मृतदेहच सापडला. दरम्यान हा अपघात नसून खुनच असल्याचा आरोप भोसले कुटुंबाने केला आहे.
सविस्तर हकीकत अशी, फलटण तालुक्यातील होळ येथील शेखर नंदू भोसले हा राहत्या घरातून दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता वडगाव निंबाळकर येथील नवनाथ घोलप याच्या गाडीवर बसून गेला. घरच्यांनी एक दिवस वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी नवनाथ घोलप याला विचारले तर शेखरला वडगाव निंबाळकर येथेच सोडल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवसांपासून घरच्यांनी शेखरचा शोध सुरू केला. अखेर दि. १२ रोजी फलटण ग्रामीण पोलीसांमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. आज दि. १४ रोजी सायंकाळी ४ वाजता बारामती तालुक्यातील मुढाळे येथील डाव्या कालव्यामध्ये शेखरचा मृतदेह सापडला. मात्र शेखरचा अपघात नसून घातपातच केला असल्याचा संशय शेखरचा भाऊ सागर भोसले याने केला आहे. दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून घटनेची नोंद करण्यात आली आहे.