Bhor News l भोरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांचा गौरव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेत पुणे विभागात गटशिक्षणाधिकारी गटातून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. गटशिक्षणाधिकारी बामणे यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
   महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी ६ जानेवारी ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत १०० दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. या कृती कार्यक्रमांतर्गत संकेतस्थळ अ‌द्यावतीकरण ,कार्यालयीन स्वच्छता,तक्रार निवारण यंत्रणा, क्षेत्रीय भेटी ,कार्यालयीन सोई-सुविधा, गुंतवणुकीस प्रोत्साहन व  सुकर जीवनमान ही सात मानके निश्चित करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी निर्धारीत कालावधीसाठी सुक्ष्म नियोजन केले.प्रशासन अधिकारी राजेंद्र एकबोटे, शापोआ अधीक्षक सुधीर साने, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन लोखंडे व हुमेरापरवीन शेख यांच्या समवू कार्यालयीन कर्मचारी, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सहकारी तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक यांना प्रोत्साहित केले.वरिष्ठ कार्यालयाकडून विचारणा होणारी माहिती त्वरित व बिनचूक देणेसाठी तालुकास्तरीय यंत्रणेला योग्य दिशा व शिस्त लावली.निर्धारित सात मानकांबद्दल योग्य नियोजन केल्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    गटशिक्षणाधिकारी बामणे दैनिक पुण्यनगरीशी बोलताना म्हणाले "हा पुरस्कार म्हणजे भोर तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच शिक्षण विभागातील माझे सर्व सहकारी व कर्मचारी यांच्या कामाची पावती आहे."
Tags
To Top