Bhor News l भोर तालुक्याच्या विकास कामांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर...! माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यासाठी सुवर्णक्षण विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून प्रगतीच्या वाटचालीत भविष्यातील दिवस उज्वल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आमदार शंकर मांडेकर यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी ३७ कोटीं ६० लाखांचा विकास निधी मंजूर झाल्याची माहिती माजी जि. प. उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.
     तालुक्याच्या विकासासाठी भरीव असा विकास निधी मिळाल्याने अनेक विकास कामे केली जाणार आहे. मंजूर निधी म्हणजे केवळ आकडा नाही.हा भोरच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचा पाया आहे.तर ३१ डिसेंबर पर्यंत ही विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत असेही शिवतरे यांनी सांगितले.कासुर्डीगुमा - मोहरी -हातवे बुद्रुक रस्त्यासाठी ७ कोटी ९५ लक्ष,हातवे बुद्रुक ते दीडघर ४ कोटी ५८ लक्ष, दीडघर फाटा ते  करंजावणे १० कोटी ६५ लाख, करंजावाणे -वांगणी-कुसगाव- शिवापुर वाडा रस्ता  १५ कोटी असा एकूण ३७ कोटी ६० लाखांचा निधी रस्त्यांच्या साडेपाच मीटर रुंदीकरणासाठी व नूतनीकरणासाठी मंजूर झाला आहे. 
                                         संतोष म्हस्के
Tags
To Top