Rajgad News l चेलाडी ते वेल्हे रस्त्याची चाळण : मनसे करणार वृक्षारोपन आंदोलन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
चेलाडी ते वेल्हे रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असुन या रस्त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपन करुन अनोखे आंदोलन केले जाणार आहे. 
       जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर म्हणाले कि चेलाडी ते वेल्हे रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असुन या रस्त्यावर मोठमोठ्या खड्डय़ामुळे अनेक युवकांचे प्राण गेले आहेत.
या रस्त्यावर पर्यटक, शालेय विद्यार्थी, कामगार जेष्ठ व्यक्ती नियमित प्रवास करीत आहेत.वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्ताच्या खड्डयामुळे मार्गासनी येथे एका युवकांचा जीव गेला आहे. तर अनेकांना अपंगत्व आलेले आहे. या जीवेघेण्या  रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर साधे खड्डे देखील बुजविले नाहीत.
          तर सत्ताधारी या रस्त्याबाबत मुग गिळुन गप्प आहेत.चेलाडी ते वेल्हे रस्त्याबाबत रविवार दि ३१ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता चेलाडी ते वेल्हे 
रस्त्यावरील खड्ड्यातमध्ये वृक्षारोपन केले जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी केले आहे.
To Top