सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
सनपाने ता. जावली येथिल ग्रामपंचायतीस नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) ओंकार मधुकर पवार यांनी सदिच्छा भेट दिली असता ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सनपाने गावचे सुपुत्र असलेले ओंकार पवार हे सध्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते गावी गणपती उत्सवासाठी आले असता त्यांनी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामसेवक राजाराम ढोक , सरपंच धर्मु राजपुरे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश दुर्गावळे ,मोहन दुर्गावळे आणि सनपाने ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसगी मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील अडीअडचणी समजून घेवून त्यावर कसे मार्ग काढले जातात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पंधरा वित्त आयोग वरती चर्चा व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना यांच्या अडचणी सोडवा असे सांगुन जलजीवन स्कीम बाबतीत चर्चा केली.