सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मालवली येथील ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्यांनी गणपती समोर अथर्व शीर्ष पठण केले अशी माहिती प्राचार्या तृप्ती शिळीमकर यांनी दिली.
विश्वा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष दसवडकर संचालिका सुप्रिया दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मध्ये गणपती समोर अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चिमुकले अथर्व शीर्ष पठण बोलत होते. सर्वच विद्याद्यानी सभागृहात गणपती समोर बसून आरती झाल्यावर अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी एकमुखाने अथर्व शीर्ष पठण केले यावेळी प्राचार्य तृप्ती शिळीमकर, शिक्षिका स्वाती शेंडकर, हर्षदा देशपांडे, ऋतुजा दसवडकर, प्रियांका पाटील, नम्रता भगत, राणी दिघे, प्राजक्ता शेडगे, मिनल रणखांबे, रेश्मा कांबळे, सानिका शिंदे, श्रेया पडवळ, प्रणिता कोतवड, शुभम सरपाले, तृप्ती येणपुरे अभिलशा गायकवाड, आदीसह विद्यार्थी उपथित होते.