पुरंदर l झेंडेवाडीच्या सरपंचपदी अमर झेंडे बिनविरोध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
झेंडेवाडी ( ता. पुरंदर ) येथे  ग्रामपंचायतीचे सरपंच वंदना शांताराम खटाटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी सरपंचपदी अमर विष्णू झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी सतिश काशिद, ग्रामसेविका एस. बी. नवले यांनी कामकाज पाहिले.
      माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व भाजपा नेते  बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक बिनविरोध पार पडली. 
     यावेळी  उपसरपंच सोनाली संतोष झेंडे,ग्रामपंचायत सदस्या पुनम संतोष झेंडे,शिवाजी सोपान खटाटे, शरद सदाशिव झेंडे,कौशल्या रामदास झेंडे, हे उपस्थित होते.
     यावेळी दिवे गावचे सरपंच रुपेश राऊत , माजी सरपंच गुलाबतात्या झेंडे,योगेश काळे , अमित झेंडे, शिवसेना नेते,राजेंद्र झेंडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष , योगेश फडतरे ,तात्यासाहेब झेंडे, बाबुराव गोळे ,जिजाबा झेंडे, शिवाजी झेंडे ,संतोष झेंडे, मयुर झेंडे, विठ्ठल झेंडे, समीर झेंडे, सोमनाथ झेंडे विकास झेंडे.रमेश झेंडे, चंद्रकांत खटाटे, भाऊसाहेब झेंडे,वडकी गावचे माजी सरपंच उत्तम गायकवाड , महेंद्र चौरे सुरेश भोसले,बाळासाहेब साबळे,पोलिस पाटील सारिका झेंडे आदीसह झेंडेवाडीकर उपस्थित होते.
     सरपंच निवड प्रसंगी बाबाराजे जाधवराव म्हणाले, गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास करावा. विकास कामांसाठी शासकीय निधीची कमतरता पडून देणार नाही.
   सरपंच अमर झेंडे म्हणाले ,ग्रामपंचायतीच्या विकास कामांना अधिकचे प्राधान्य देणार असून ग्रामपंचायतीसाठी विविध विकास कामे केली जाणार असून सर्व वाड्या वस्त्यांना त्याचबरोबर ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
    यावेळी उत्तम गायकवाड, चंद्रकांत खटाटे, माऊली खटाटे, बाबुराव गोळे, कौशल्या झेंडे, रुपेश राऊत, अमित झेंडे,गुलाबतात्या झेंडे ,अजित गोळे यांनी मनोगते व्यक्त करून सरपंच अमर झेंडे यांचे अभिनंदन केले.
    अमर झेंडे यांची सरपंच पदी निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी,लाल भडक गुलालाची उधळण करण्यात आली. डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिवे झेंडेवाडी पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गोळे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ झेंडे यांनी केले. आभार भाऊसाहेब झेंडे यांनी मानले.
     
To Top