सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : सोमनाथ साखरे
राज्याचे सरकार हे सर्व सामान्य जनतेचे सरकार असून सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू समजून सरकारच्या वतीने प्रत्येक घटकाला शासनाचा लाभ मिळावा म्हणून दि. १७ सप्टेंबर ते दि २ आक्टोबर या सेवा पंधरवड्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनते पर्यंत पोहचवावा अशा सुचना सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातुरचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
मेढा येथिल कलश मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज अभियानातर्गत राष्ट्र नेता पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दि. २ आक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपसभापती सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, सातारचे उपविभागीय अधिकारी आशिष बारकुले, जावलीचे उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे, तहसिलदार हणमंत कोळेकर, सागर धनावडे, मारुती चिकणे, संदिप परामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले शासनाच्या १०० दिवसाच्या कृती आराखड्यात आपल्या येथे लक्ष्मी मुक्ती योजना, वारसनोंदी , मयत नोंदी , तगाई बोजा आदी बाबत योग्य तो निर्णय झाल्याने दोन हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. नविन होणारे रस्त्यांना नंबर पडणार असल्याने त्यावर शासनाकडून खर्च टाकता येणार आहे. तसेच पोट खराब लागवडी योग्य क्षेत्राची नोंद झाल्याने शेतकऱ्याला कर्जाचा लाभ मिळणेस सोपे होईल असेही ना. भोसले यांनी सांगितले.
यावेळी ना. शिवेंद्रराजे म्हणाले देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या संकल्पनेतून एकही व्यक्ती घरकुलावाचुन वंचित राहणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्याने न भुतो न भविष्यती अशी घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे असे ही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले नैसर्गीक आपतीचा सामना करताना देवेंद्रजीं , एकनाथजी शिंदे, अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. ऑगस्ट मध्ये मराठवाडया झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ कोटी जमा केले आणि आताही लातुर साईटला झालेल्या नुकसानीसाठी २४४ कोटी शेतकऱ्यांचा खात्यात जमा केले असल्याचे सांगीतले. ते पुढे म्हणाले नैसर्गिक आपती संपलेली नाही तरीही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून ते शासनाकडे पाठवावेत अशास सुचना यावेळी ना. भोसले यांनी प्रांताधिकारी व तहसिलदार यांना केल्या.
यावेळी बोलताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाच्या वतीने अनेक उपक्रम हाती घेतले असून त्यामध्ये अनेक वर्षे रखडलेले पाणंद रस्ते, नविन काढावयाचे रस्ते, वारस नोंदी, घरकुले, अनुदानित अवजारे, आयुष्यमान कार्ड आदी कामे होणार आहेत. या सर्व योजनांचा लाभ सामान्य जनतेने घेणे गरजचे आहे असे सांगुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जनतेच्या कल्याणकारी योजना पुर्ण करण्यासाठी प्रयत्न शिल आहेत असेही सांगितले. ते पुढे म्हणाले या अभियानात रक्तदान सुरु असून सर्वांनी रक्तदान करून राष्ट्रहित जोपासावे असे आवाहन केले.
सेवा पंधरवडा निमित्ताने कलश मंगल कार्यालयात तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, विद्युत वितरण , महिला बाल कल्याण आदी विभागांनी जनतेला मिळाणाऱ्या योजना पोहचविण्यासाठी वेगवेगळे स्टॉल उभारून माहिती देण्यात येत होती. या प्रसगी शेतकऱ्यांना अवजारांचे वाटप, घरकुलांचे प्रमाणपत्र आदीच आदीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी केले तर स्वागत व सुत्रसंचालन नायब तहसीलदार सुनिल मुनाळे यांनी केले.