Baramati News l करंजेपुल ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुहास गायकवाड यांची बिनविरोध निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायतच्या 
उपसरपंचपदी सुहास माणिकराव गायकवाड यांची बिनविरोध निवड पार पडली. 
          प्रवीण गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपदासाठी एकमेव सुहास माणिकराव गायकवाड यांचा अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत करंजेपूलच्या  विकासासाठी आम्ही सर्व सदस्य, उपसरपंच कटिबद्ध राहू असा विश्वास करंजेपूल ग्रामपंचायतचे उपसरपंच सुहास गायकवाड यांनी निवड झाल्यानंतर दिला.
           या निवडीसाठी आप्पासाहेब गायकवाड, रमाकांत गायकवाड, शिवाजी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अनिल गायकवाड, ऋषिकेश गायकवाड,साहेबराव गायकवाड,निवृत्ती शेंडकर,रूपचंद शेंडकर,शशिकांत गायकवाड, प्रवीण गायकवाड, संभाजी गायकवाड, सचिन लकडे, निखिल शेंडकर, लक्ष्मण लकडे, बबन पवार, रामचंद्र शेंडकर, रामराजे राजवडे, सागर गायकवाड, निलेश गायकवाड, हरीश गायकवाड,राहुल गायकवाड,नाना गायकवाड,प्रदीप शेंडकर,राजेंद्र गायकवाड,विनोद गायकवाड,राजेंद्र धुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top