सुपे परगणा l दीड वर्षापासुन रखडलेला वढाणे रस्त्याचा तंटा मिटवण्यात महसूल विभागाला यश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे मंडलांतर्गत वढाणे येथील दीड वर्षापासुन शेतात जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत होता. त्या रस्त्याचा तंटा मिटविण्यास महसूल प्रशासनास यश आले. बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे यांच्या मध्यस्थीने या रस्त्याचा मार्ग सुटण्यास अधिक मदत झाली. 
      छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा १७ सष्टेंबर जन्मदिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबर जयंती हा कालावधी महसूल विभागाकडून सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. 
         यावेळी वढाणे येथील कुतवळवाडी शिव ते नाला असा एक किलोमीटरच्या रस्त्याचा मागिल दोन वर्षापासूनचा वाद होता. त्यामुळे गट क्रमांक ५२४, ५२५ आणि ५२९ मधील नामदेव चौधरी आणि सचिन चौधरी आदी दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार गणेश शिंदे यांच्याशी बुधवारी ( दि. २४ ) चर्चा केली. या चर्चेतून रस्त्याचा प्रश्न सामोचाराने मिटविण्यास यश आले. त्यामुळे सुमारे ५ हेक्टर ७३ आर या क्षेत्राला त्याचा फायदा झाला. 
       सुपे येथील मंडल कार्यालयातील आवारात तहसिलदार शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, येथील प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी मनोजकुमार नवसरे, सुपे येथील सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, येथील मंडलाधिकारी हंसध्वज मनाळे, ग्राममहसूल अधिकारी नीलम देशमुख, नीलेश गद्रे, राहुल केंद्रे, आशितोष पाटील, अनिता धापटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.  
            ..................................

To Top