सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : प्रतिनिधी
राजगड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे माजी अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांचा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला.
यावेळी भोर राजगड मुळशी तालुक्याचे आमदार शंकर भाऊ मांडेकर रणजीत शिवतरे जालिंदर कामठे उपस्थित होते देशमाने यांच्या सोबत विशाल शिळीमकर सरचिटणीस भाजपा,उत्तम रेणुसे उपाध्यक्ष अध्यात्मिक आघाडी,सोमनाथ शेंडकर मा.उपाध्यक्ष, प्रकाश बोडके चिटणीस, राजेंद्र खुळे मा.युवा सरचिटणीस,लहु भुरुक भाजप मधून राष्ट्रवादीत प्रवेश केला