बारामती l शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तालुक्याच्या पश्चिम भागात दौरा : विविध विकास कामांच्या भूमिपूजनासह शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शुक्रवारी दि. २६ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सोमेश्वर कारखान्याच्या डिस्टिलरी विस्तार प्रकल्प, १०० खाटांचे भव्य हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहेत. त्याच बरोबर सोमेश्वर कारखान्यावरील छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
          सोमेश्वर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कारखाना स्थळावर शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.  या प्रकल्पाअंतर्गत डिस्टिलरीचा विस्तार ३० KLPD वरून ९० KLPD पर्यंत तर इथेनॉल प्लांटचा विस्तार ३० KLPD वरून १२० KLPD पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांसाठी विशेष मेळावाही आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
        तसेच आरोग्य क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीच्या अधिनस्त १०० खाटांचे हॉस्पिटलला अजित पवार यांनी मंजुरी दिली होती. त्या तब्बल ६४ कोटी रुपयांच्या निधीतून वाघळवाडी येथे १०० बेडचे हॉस्पिटल वाघळवाडी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन मळशी रोडलगत, अक्षय गार्डन जवळील १० एकर जागेवर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
     त्यानंतर, ४.५ कोटी रुपये निधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखाना परिसरातील वाचनालया शेजारील दीड एकर जागेत सायंकाळी ५:३० वाजता पार पडणार आहे. याबाबत वाघळवाडीचे सरपंच अ‍ॅड. हेमंत गायकवाड यांनी माहिती दिली.
To Top