सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक : प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) — येथील प्रगतशील बागायतदार व महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कॅनल इन्स्पेक्टर (मोजणीदार) म्हणून ३५ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेले किसनराव भिकोबा धापटे (वय ८६) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, नातवंडे असा परिवार असून ते बारामती पंचायत समितीचे सभापती श्री. प्रदीप धापटे यांचे चुलते होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.