सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
गेल्या वर्षी संस्थेमार्फत १६९ मे. टन मका ( स्वीटकॉर्न ) खरेदी-विक्री केली असुन चालु वर्षांत ३०० मे.टन खरेदी-विक्रीचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता सुपे येथे सव्वा कोटीचा मका प्रक्रिया उद्योग ( स्वीटकॉर्न प्रकल्प ) उभारणार असल्याची माहिती माऊली कृषी उत्पादक संस्थेच्या वार्षिक सर्वासाधारण सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश चांदगुडे, उपाध्यक्ष अरुण कुतवळ यांनी दिली.
सुपे ( ता. बारामती ) येथे माऊली कृषी उत्पादक संस्था कुतवळवाडी यांची तिसरी सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील महाएफपीसी तज्ञ राहुल घोडसे उपस्थित होते.
याअगोदर मका प्रक्रिया करण्यासाठी बाहेर जावे लागतं होते. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत होती. आत्ता येथे प्रक्रिया उद्योग झाल्यावर खर्चात बचत होणार असल्याने नफ्यात वाढ होणार आहे. त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. ऊसाच्या तुलनेत मका पिक कमी पाण्यावर येते. याशिवाय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लागतो. त्यामुळे या संस्थेचे जास्तीत सभासद मका पिक घेण्याकडे वळाल्याची माहिती संस्थेचे मुख्याधिकारी अमित कुतवळ यांनी दिली.
संस्थेचे उत्कृष्ट कामकाज असल्याने केंद्राची सहकार विषयीं असणारी धोरणं आणि त्याच्यापासून शेतकरी उत्पादक संस्थेला ( एफपीओ ) होणारा फायदा याबद्दल गोडसे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान या संस्थेवर बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश चांदगुडे, उपाध्यक्ष अरुण कुतवळ, संचालक सुभाष चांदगुडे, नितीन कुतवळ, सागर चांदगुडे, ऋषिकेश काकडे, बबन देवकाते, रुपाली मचाले, निकिता कुतवळ, शितल चिपाडे यांचा सत्कार करण्यात आला.
...................................