Bhor News l सारोळेच्या दफनभूमी परिसरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या : राजगड पोलिसांचा तपास सुरू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे–सातारा महामार्गालगतच्या सारोळे ता.भोर येथील मुस्लिम दफनभूमी परिसरात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि.९ उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
     मृत युवकाचे नाव इर्शाद शेख (वय अंदाजे ३८ रा. पांडे, ता.भोर) असे असून स्थानिक नागरिकांनी सकाळच्या सुमारास दफनभूमीच्या परिसरात गळफास घेतलेला मृतदेह पाहून तत्काळ राजगड पोलिसांना माहिती दिली.राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा युवक काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत असली तरी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.या घटनेमुळे सरोळे,पांडे आणि आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.स्थानिकांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त करत पोलिसांकडे आत्महत्येच्या कारणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

To Top