सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील सदाशिव निवृत्ती खरात यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी सुना, जावई आणि नातवंडे आहेत. ते निमसाखर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. राहुल खरात यांचे ते वडील होत.