सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
पुणे जिल्हा शिक्षण मंडळात पहिल्या पाच क्रमांकात आलेल्या सुपे ( ता. बारामती ) येथील श्री शहाजी विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कै. बाबुराव रामचंद्र घोलप चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच तुषार हिरवे होते.
यावेळी इयत्ता बारावीच्या परीक्षेत उर्मिला सिदा मोटे तर दहावीच्या परीक्षेत अनुष्का बापू कुतवळ, स्नेहल शिवाजी चांदगुडे आदी विद्यार्थी संस्थेत पहिल्या पाच क्रमांकात आल्याने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अंदोबा नेवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष पोपट चिपाडे, अशोक बसाळे, जेष्ठ नागरिक बबन बोरकर, अशोक लोणकर, अरूण कुतवळ, राहुल भोंडवे, आरसीसी क्लबचे सचिव प्रकाश चौधरी, सदस्य सचिन कुतवळ, सचिव सूर्यकांत कुंभार, सदस्य दत्तात्रय सपकाळ, प्रभाकर काळे, नंदकिशोर काकडे, मधुकर ढोबळे, जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुरेश फडतरे, रामभाऊ वाबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले. अशोक बसाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार सुरेश फडतरे यांनी मानले.
....................................
