सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे ग्रँड चॅलेंज टुर सायकलिंग स्पर्धेतील सायकलपटूंच्या सुरक्षिततेसाठी नीरा ते मोरगाव या मार्गाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत हे काम होणार असून, त्या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धेतील तिसऱ्या फेजमध्ये २२ जानेवारी २०२६ रोजी सासवड ते बारामती अशा मागनि स्पर्धक जाणार आहेत. यामध्ये समावेश असलेल्या नीरा- मोरगाव या २४ किलोमीटर रस्त्याचे काम झालेले असतानाही पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे डांबरीकरणाचा थर द्यावा लागणार आहे.
---------------
असा असेल पर्यायी मार्ग----
मोरगाव ते मुर्ती रस्त्याचे काम सुरू असताना, पर्यायी मार्ग- मोरगाव-लोणीपाटी लोणीभापकर कोहळे बु- सोमेश्वरनगर, मुर्ती ते चौधरवाडी फाटा टप्प्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्ग मुर्ती वाकी करंजे सोमेश्वरनगर, चौधरवाडी फाटा ते नीरा टप्प्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्ग- चौधरवाडी फाटा- करंजे-सोमेश्वरनगर, नीरा गावाहून मोरगावला जाण्यासाठी नीरा वाल्हे जेजुरी-मोरगाव हा मार्ग वापरता येईल.
---------------
मोरगाव- चौधरवाडी फाटा ते सोमेश्वरनगर अशी मोठ्या प्रमाणात ऊस व अन्य वाहतूक होते. त्यासाठी तीन टप्प्यात वेगवेगळे मार्ग उपलब्ध केले आहेत. नीरा- मोरगाव किंवा मोरगाव- नीरा प्रवास वाल्हे-जेजुरी मार्गे वळविण्यात येणार आहे.
सहायक पोलिस निरीक्षक
नागनाथ पाटील
