Baramati News l भाजप युवा मोर्चाच्या बारामती तालुकाध्यक्षपदी सुजित सोरटे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी सुजित सोरटे यांची निवड करण्यात आली.                जिल्हाअध्यक्ष वैभव सोलनकर यांनी नुकतीच नियुक्तीपत्रक देऊन अध्यक्षपदी निवड केली. सुजित सोरटे यांनी यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नासाठी आंदोलने केली आहेत. आभाविपचे शहर मंत्री, जिल्हा अधिवेशन प्रमुख अश्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. निवडी वेळेस जिल्हा युवा मोर्चा सचिव शिवानी चौधरी बारामती दक्षिण मंडळाध्यक्ष सुनील माने बारामती दक्षिण मंडळ उपाध्यक्ष बापूराव फणसे, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष विपुल भांडवलकर, सचिन मोकाशी, सचिन भांडवलकर, मोहन भांडवलकर, प्रफुल पाटोळे, राम शिरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top