सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणाच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारांनी तहसिल कार्यालयात दाखल केले. याच दरम्यान शिवसेना (शिंदे गट), शिवसेना ( उबाठा गट ) राष्ट्रवादी ( शप ), राष्ट्रवादी ( अजीत पवार ), आरपीआय आणि अपक्ष यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याचे अखेरचे दिवशी एकूण ९० अर्ज दाखल झाले असून आज ( दि. २२ ) रोजी छाणनी होणार असल्याची माहीती निवडूक निर्णय अधिकारी श्रीमती जयश्री मोरे यांचेकडुन देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद म्हसवे (३६ ) गटासाठी बारा अर्ज, कुडाळ (३७ ) गटासाठी नऊ अर्ज आणि 38 कुसुंबी ( ३८ ) गटासाठी अकरा नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. तसेच पचायत समिती खर्शी बारामुरे ( ७१ ) गणासाठी पंधरा नामनिर्देशन अर्ज, म्हसवे ( ७२ ) गणासाठी दहा नामनिर्देशन अर्ज, कुडाळ (७३ )गणासाठी अकरा नामनिर्देशन अर्ज, सायगाव ( ७४ ) गणासाठी सहा नाम निर्देशन अर्ज, आंबेघर त मेढा ( ७५ ) गणासाठी चार नामनिर्देशन अर्ज दाखल आणि कुसुंबी ( ७६) गणासाठी बारा नामनिर्देशन अर्ज दाखल झालेले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती जयश्री मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण मुदगुल यांनी सांगीतले.
तहसिल कार्यालया बाहेर उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी अफाट गर्दी झालेली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत कुसुंबी गटातील भाजपचे उमेदवार सौ. अर्चना रांजणे तसेच गणाचे उमेदवारांसह एसटी डेपो कडून शक्ती प्रदर्शन करीत तसेच कुडाळ, म्हसवे गटातील सौ.जयश्री गिरी, सौंरभ शिंदे यांनी कुडाळ विभागातुन वाद्यांसह शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सपोनि सुधीर पाटील पाटील यांचे मतदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
