सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : दिपक जाधव
शहाजीराजेंचा माहीत नसलेला इतिहास, स्वराज्यासाठी त्यांनी केलेला निस्सीम त्याग, तसेच स्वराज्याच्या गनिमी काव्याची सुरुवात, स्वराज्याची संकल्पना, त्यागाचे बाळ कडू, लढाऊ वृत्ती आणि दूरदृष्टीचे ज्ञान हे सर्व छत्रपती शिवरायांना श्रीशहाजीराजे भोसले यांच्याकडूनच वारसा हक्काने मिळालेला आहे.
त्यामुळेच शहाजीराजे यांचा इतिहास पुढे येण्याची काळाची गरज असल्याचे मत व्याख्याते राकेश पिंजन सरकार यांनी केले. सुपे येथील जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात स्वराज्य संकल्पक श्रीशहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'प्राजक्ता ' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंजन सरकार बोलत होते. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात बारामती येथील सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल शेलार, गोरक्षनाथ बोराडे यांचे "सुरक्षित वाहतूक व अपघात टाळण्यासाठी उपाय" या विषयावर व्याख्यान झाले.
दरम्यान पुणे व बारामती येथील दंतरोग तज्ञ यांच्या सहकार्याने विद्यालयाच्या आवारात मोफत दंतरोग व मूखरोग तपासणी व मार्गदर्शन शिबीरात २५० लाभर्थ्यांनी मोफत लाभ घेतला. या शिबिरात मुकुंद पत्की, डॉ. अमित नेमाने, डॉ.अक्षय चौगुले, मुकुंद पत्की, डॉ. तुषार घोडे, डॉ.दर्शन वाबळे, डॉ. पल्लवी वाबळे, डॉ. श्रीप्रसाद वाबळे, मोरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी शिंदे आदीचे सहकार्य मिळाले.
याप्रसंगी माजी सभापती पोपटराव पानसरे, प्राचार्य डॉ. संजय काळे, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे, प्रमोद भोसले, हनुमंत चांदगुडे, सुनील भोसले, मधुकर बोरकर, युवराज चांदगुडे, अमित कुतवळ, गणेश खैरे, शरद भोंडवे, संतोष कोंडे, निलेश पानसरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बसाळे यांनी केले. व्याख्याता परिचय व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी व कार्यक्रमाचे आभार प्रकाश चांदगुडे यांनी मानले.
