सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे मंगळवार पासून (दि. ६) तीन दिवस प्राजक्ता व्याख्यानमाला होत आहे.
सुपे परगणा ग्रामस्थ व दानशूरांच्या सहकार्याने जीवन साधना फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने प्राजक्ता मतिमंद विद्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे बारावे वर्ष आहे.
मंगळवारी ( दि.६ ) ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांचे हास्यकरंजी या विषयावर व्याख्यान होणार आहे.
बुधवारी ( दि.७ ) कोल्हापूर येथील नैसर्गिक शेतीचे गाढे अभ्यासक राहुल टोपले यांचे नैसर्गिक शेती अर्थात विषमुक्त जीवनशैली व आनंदी जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तर गुरुवारी ( दि.८ ) सोलापूरचे माजी आमदार ॲड.रामहरी रुपनवर-पाटील मानवी जीवनाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवारी ( दि.२३ ) स्वराज्य संकल्पक श्रीशहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी दहाच्या दरम्यान बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांचे सुरक्षित वाहतूक व अपघात कसे टाळावेत या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान यादिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. रात्री आठच्या दरम्यान पुण्यातील राकेश पिंजन सरकार यांचे महाराजसाहेब तुम्ही होतात म्हणून.. या विषयावर व्याख्यान होणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे व सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे यांनी केले आहे.
.............................................
