सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
मालवली (ता. राजगड) येथील ड्रीमलँड इंग्लिश स्कूल शाळेतील आनंदी बाजारास नागरिक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विश्व फाउंडेशन चे ड्रीमलँड इंग्लिश स्कूल कडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंदी बाजाराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे, दैनंदिन आहारातील शेतामध्ये पिकविणाऱ्या फळभाज्यांची माहिती मिळावी आणि अर्थव्यवहारात आवड निर्माण व्हावी या हेतूने आनंदी बाजार आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या संचालिका सुप्रिया दसवडकर मनसेचे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे राजू झांजे, विकास भिकुले, महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम दसवडकर, प्रथमेश दसवडकर, प्रीतेश दसवडकर संदीप सरपाले, माजी सरपंच अशोक चोरघे, दत्ता शेंडकर,प्राचार्य तृप्ती शिळीमकर , शिक्षिका स्वाती निगडे, राणी दिघे, सानिका शिंदे, श्रेया पडवळ, प्रणिता कोतवाड, तृप्ती येणपूरे, नम्रता भगत, ऋचा जामदार, हर्षदा देशपांडे, रेश्मा कांबळे, मिनल रणखांबे, ऋतुजा दासवडकर, अभिलाषा गायकवाड आदीसह पालक उपस्थित होते या उपक्रमाचे पालकांनी मोठ्या आनंदाने कौतुक केले.
