सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती मध्येच लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे,
माहिती मधील राष्ट्रवादी अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. आमदार शंकर मांडेकर व माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यामध्ये सरळ लढत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र झाला असून ही आघाडी देखील सत्ता मिळवण्यासाठी सरसावली आहे, माजी आमदार संग्राम थोपटे हे अगोदर काँग्रेसचे आमदार म्हणून काम करीत असताना सलग कित्येक वर्ष पंचायती समितीवर काँग्रेसची एक हाती सत्ता होती, परंतु संग्राम थोपटे यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये सर्वच मंडळी भाजपमध्ये गेले आहेत, तालुक्यात काँग्रेसला कोणताही वाली राहिलेला नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महाविकास आघाडीतील पक्षांची सोबत तीन वेळा बैठका घेतल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 2009 साली पंचायत समितीच्या चार पैकी दोन जागा जिंकल्या गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेऊन निवडणुक लढाईच्या तयारीत आहे, मागील दोन वर्षापासून सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळे कार्यक्रम घेत लग्न समारंभ, अंत्यविधी, दहावी तेरावे, वाढदिवस, हळदी कुंकू समारंभ, यांना हजेरी लावली आहे तर शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात ताडपत्री वाटप, सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, सायकल, आरोग्य शिबिरे, मोफत देवदर्शन, मोफत रस्ते करून दिले आहे. तर गावागावात घोंगडी बैठका चार ते पाच वेळा घेतले आहेत, तर तालुक्यात विविध ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करून त्यांना बक्षिसे दिली आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी तालुक्यात विविध गावांमध्ये विकास कामांसाठी निधी दिलेला आहे, तसेच गाव गावा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वाढले असून गाव गावांमध्ये रस्ते, लाईट, पाणी, यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून पंचायत समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार शंकर मांडेकर हे विविध ठिकाणी जाऊन पक्षांची बांधणी करत आहेत, तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी बैठका घेत आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे हे देखील भारतीय जनता पार्टीतील जुनी व नवीन कार्यकर्त्यांचा व मेळ घालित पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात विविध ठिकाणी विकास निधी आणत आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील विकास कामे तालुक्यात विविध ठिकाणी सुरू आहेत, भारतीय जनता पार्टीतील जुने कार्यकर्ते तसेच काँग्रेस मधून नव्याने प्रवेश केलेले सर्वच कार्यकर्ते यांना एकत्रित करून विविध ठिकाणी संग्राम थोपटे बैठका घेत आहेत, कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात पंचायत समिती आणायची असा निश्चय केलेला आहे, तर दुसरीकडे तिरंगी लढतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, व इतर घटक पक्ष यांची एकत्रित मोट बांधली असून एकत्रित लढण्याची तयारी केली आहे.
नुकताच काँग्रेसचा राहिलेला एक गट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला तालुक्यामध्ये उमेदवार राहिलेला नाही. फिजिकल एक हत्ती काँग्रेसची सत्ता पंचायत समितीवर असताना आज मात्र या काँग्रेसला उतरती कळा लागली असून येथे उमेदवार नसल्याने काँग्रेस तालुक्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार जास्त असल्याने आमदार शंकर मांडेकर यांची डोकेदुखी वाढणार आहे, तर भारतीय जनता पार्टीमध्ये देखील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने माजी आमदार संग्राम थोपटे यांना देखील उमेदवारीसाठी त्रास होणार असल्याचे दिसत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये उमेदवारी बाबत तीन वेळा चर्चा झाली आहे. हे तीन पक्ष एकत्रित लढले तर चित्र मात्र वेगळा असू शकते, यावेळी पंचायत समितीवर एक हाती सत्ता आणण्यासाठी दोन्ही आमदार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
