सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मित्रांसोबत राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा किल्ल्यावरून खाली उतरताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध होत पडल्याने मृत्यू झाल्याची शनिवार दि.१४ घटना घडली. या घटनेतून संदीप बाळकृष्ण पवार वय ५२ (रा.आरफळ )ता. सातारा यांचा मृत्यू झाला.याची फिर्याद रमेश हरिभाऊ हिवरकर रा.बारामती यांनी राजगड (वेल्हे)पोलिसात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील एका खाजगी कंपनीतील दीपक वाघ, अमोल धुमाळ, जीवन येडे ,प्रसाद गुरव,राहुल लाबोळे, संदीप पवार, मनोहर, बेलकर भानुदास कोळपे, कानिफनाथ बोस, नितीन खलाटे, दीपक जगताप, रमेश सुपेकर, यश तावरे, प्रशांत पारवे, महेश गुड, गणेश माने, सागर पाटील, महेश मोरे ,दीपक जगताप कंपनीला सुट्टी असल्याने खाजगी वाहनाने राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून दुपारच्या दरम्यान खाली उतरताना संदीप पवार यांना अचानक चक्कर आली.दरम्यान पवार जमिनीवर पडले व बेशुद्ध झाले.त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठले नाही.तात्काळ त्यांना स्थानिक ग्रामस्थ तसेच मित्रांच्या मदतीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घेऊन आलो असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मयत झाले बाबत कळविले मयत झाले त्याचे पूर्ण नाव संदीप बाळकृष्ण पवार यांचा मृत्यू झाला.पुढील तपास राजगड (वेल्हे) पोलीस करीत आहेत.
