सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या 'ज्युनियर - मास्टर्स - दिव्यांग पुणे श्री २०२६' या शरीरसौष्ठव स्पर्धेत गणेश नवनाथ तनपुरे( रा.खानापूर ता.भोर)याने चमकदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकावला.गणेश तनपुरे याचे वीसगाव खोरे पंचक्रोशी तसेच तालुक्यातून कौतुक होत आहे.
शरीर सौष्ठव स्पर्धा रविवार दि.१ पुणे येथे पार पडली.गणेश तानपुरे हा 'वर्ल्ड ऑफ फिटनेस' जिमचा खेळाडू असून त्याला प्रसिद्ध शरीरसौष्ठव प्रशिक्षक निलेश धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि शिस्तीमुळे गणेशने याने घवघवीत यश संपादन केले असल्याचे प्रशिक्षक निलेश धोंडे यांनी सांगितले. नियमित व्यायाम तसेच प्रशिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन,आई-वडिलांचे मोलाचे सहकार्य याचा फायदा झाला. तरुणांनी शैक्षणिक जीवनात नियमित व्यायाम तसेच कलागुणांना वाव द्यावा भविष्यकाळ घडेल असे सोमेश्वर रिपोर्टरशी बोलताना गणेश तनपुरे यांनी सांगितले.तर गणेशचे ग्रामस्थ मंडळ खानापूर तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.
