Rajgad News l भाजपच्या पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी शुभम बेलदरे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : प्रतिनिधी 
राजगड तालुक्यातील वेल्हे येथील शुभम बेलदरे यांची भाजपाच्या पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
        जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात युवकांचे संघटन करून युवकांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी बेलदरे यांनी सांगितले.

To Top