सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्याची दखल घेत, सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डिप्लोमा) महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शिकत असतानाच 'ट्रेनी इंजिनिअर' आणि 'सॉफ्टवेअर ट्रेनी इंजिनिअर' पदावर नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांची निवड 'टीई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रा. लि. (शिरवळ, खंडाळा)' आणि 'ओम व्ही सॅव आयटी सोल्यूशन प्रा. लि. (पुणे)' या दोन कंपन्यांमध्ये झाली आहे. टीई कनेक्टिव्हिटी इंडिया (शिरवळ) या कंपनीत एकूण ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील १५ आणि मेकॅनिकल विभागातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक २.४ लाख रुपये पॅकेज आणि कंपनीचे इतर भत्ते दिले जाणार आहेत.
ओम व्ही सॅव आयटी सोल्यूशन (पुणे) या कंपनीत कॉम्प्युटर विभागातील १० विद्यार्थ्यांची 'सॉफ्टवेअर ट्रेनी इंजिनिअर' म्हणून निवड झाली असून, त्यांना वार्षिक १.४ लाख रुपये पॅकेज व इतर भत्ते मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, सचिव भारत खोमणे आणि सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ हजारे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर अमरजीत घाडगे, विभाग प्रमुख विवेक भापकर, रोहिणी धारे, ज्योती खरात, तसेच तुषार गावडे, मोरेश्वर भोईटे आणि राहुल कदम यांनी विशेष प्रयत्न केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची काही नावे:
इलेक्ट्रिकल: घुले संजिवनी, वरकडे वर्षा, कांबळे सानिका, वाघमारे जय, देशमुख रणवीर, खाडे वैभव, कुदळे सिदेश, मुळिक प्रणव, उबाळे आदित्य, कुदळे संकेत, कारंडे ओंकार, घाडवे सार्थक, देसाई हर्षवर्धन, नाझीरकर किरण, पिसाळ ओम
मेकॅनिकल: होले एश्वर्या, सय्यद आयान, चांदगुडे संजिवनी, पडळकर शुभम, थोपटे सार्थक, नरूटे शुभम, कुदळे आदित्य, भोईटे हर्षवर्धन, यादव संकेत, धुमाळ पृथ्वीराज, खोमणे आदित्य, भोईटे सार्थक, शिंदे श्रावणी, रासकर रोहन गायकवाड प्रणव, यादव मानस, दगडे समर्थ, पवार अजय, प्रवाळे उपासना, अडसुळ मयुर
कॉम्प्युटर: चव्हाण गौरव, धावडे समिक्षा, सोनवलकर दुर्वेश, गायकवाड पुर्वा, होळकर गौरी, जाधव नेहा, पिंगळे सृष्टी, सोनवलकर स्वप्निल, गोरे स्वानंदी व थोपटे शेजल
